रियाने सांगितलं तिच्या मोबाईलमधील एयू म्हणजे नेमकं कोण ?वेब टीम : मुंबई
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे रिया चक्रवर्तीला पाठिंबा देत असल्याची चर्चा होती. 

याबाबत रिया म्हणाली "अे.यू म्हणजे माझी मैत्रिण अनाया उदास हिचे नाव आहे, आदित्य उद्धव नव्हे." 

मी आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, असेही रिया चक्रवर्तींने म्हटले आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. 

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी, स्वयंपाकी नीरजसिंह यांच्यासोबत  चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांची सीबीआयने चौकशी केली होती. 

आता सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे.

सकाळी 10.30 वाजल्यापासून रियाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

रियाला या प्रकरणी सातत्याने लक्ष्य केले जात असून, आता रियाच्या समर्थनासाठी नेटिझन्स रिंगणात उतरले आहेत. 

या प्रकरणी रिया चक्रवर्ती हिला लक्ष्य करण्यात येत आहे. तिच्यावरील गुन्हा सिद्ध होण्याआधी काही वृत्तवाहिन्या ती दोषी असल्याचे दाखवत आहेत. 

यावरुन आता रियानेही मौन सोडून थेट भूमिका मांडली आहे. यानंतर आता रियाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली आहे. 

यामुळे एवढे दिवस सुशांतला न्याय मिळावी, अशी मागणी करणारे नेटिझन्स आता रियाला न्याय मिळावा ही  मागणी करु लागले आहेत. 

यामुळे आज ट्विटरवर #JsuticeForRhea हा हॅशटॅग ट्रेंडिंग होता. रियाला कोणत्याही पुराव्याशिवाय या प्रकरणी खलनायिका ठरवण्यात आल्याने तिच्या बाजूने आता नेटिझन्स मैदानात उतरत आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post