मोदीजी, आता दाऊदला पकडून भारतात आणा... रोहित पवारांची मागणी...


वेब टीम : मुंबई 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचं पाकिस्ताननंच कबूल केल्यानं आता दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. 


रोहित पवार यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी केली आहे.दाऊद इब्राहिम कराचीतच असल्याचं पाकिस्तानने आता कबूल केलं आहे. 


त्यामुळे दाऊदला भारतात आणा. कोणत्याही परिस्थितीत आणा, अशी मागणी रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 


दाऊद पाकिस्तानातच असल्याचं उघड झाल्यानंतर भारतीय मीडियाने या वृत्ताला ठळक प्रसिद्धी दिल्याने पाकिस्तानने दाऊद पाकमध्ये नसल्याचा पुन्हा कांगावा केला आहे. 


त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला आहे. 


दाऊदचा एकेकाळचा विश्वासू साथीदार एजाज लकडावालाने मुंबई पोलिसांच्या चौकशीत यावर्षीच्या जानेवारी महिन्यातच दाऊदबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली होती. 


१९९३मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला दाऊद आजही कराचीतच आहे, असे सांगतानाच दाऊदच्या दोन घरांचे पत्ते लकडावालाने पोलिसांना दिले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post