'या' मराठी अभिनेत्यासह त्याच्या पत्नी व मुलालाही कोरोनाची लागणवेब टीम : पुणे

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढत आकडा हा नवनवीन उच्चांक गाठत असतानाच सामान्य व्यक्तीपासून ते राजकीय नेते, मंत्री, लोकप्राधिनिधी व बॉलिवूड स्टार्सना देखील कोरोनाचा विळखा पडत असल्याचे दिसून येत आहे.  


काही वेळापूर्वीच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.


सुबोध भावे यांनी ट्विट करून ही माहिती दिली असून त्यांची पत्नी मंजिरी व मोठा मुलगा कान्हा याला देखील कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी सांगितले. ” 


मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 


आम्ही घरीच स्वतःला  क्वारंटाईन करून घेतले आहे. तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत. 


तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. गणपती बाप्पा मोरया” असे ट्विट त्यांनी केले आहे.


दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीतील एम्स या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्सने दिली होती. २ ऑगस्ट रोजी अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post