भारताचा चीनला जोरदार दणका... दक्षिण चीन समुद्रात केले 'असे'...वेब टीम : दिल्ली

भारतीय नौदलाने दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात केली आहे. 


गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारताने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. 


गलवानमधील हिंसक संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहीद झाले होते. 


या घटनेनंतर नौदलाने आपली एक आघाडीवरील युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात तैनात केली आहे.


दक्षिण चीन समुद्रात चीनने आपले सामर्थ्य वाढविले आहे. या भागात चीन भारतीय नौदलाच्या जहाजांना विरोध करत आला आहे. 


याविरोधात वेळोवेळी चीनने तक्रारीही केल्या आहेत. 


भारतीय नौदलाच्या या जहाजाच्या तैनातीमुळे चीनमध्ये अस्वस्थता असून, चीनने काल व्हिडिओ कॉन्फरसिंगवरून झालेल्या द्विपक्षीय चर्चेत भारतासमोर हा मुद्दा उपस्थित केला. 


तसेच भारताने घेतलेल्या या निर्णयाचा निषेधही व्यक्त केला. 


चिनी नौदल पीपल्स लिबरेशन आर्मीचा विरोध डावलून भारताची युद्धनौका आपल्या अमेरिकेच्या समकक्षाच्या सतत संपर्कात आहे. 


अमेरिकेची जहाजेदेखील या भागात आहेत. 


पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दक्षिण चीन समुद्रात युद्धनौका तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post