दिलासादायक : राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त


वेब टीम : मुंबई
राज्यात आज पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात ९ हजार ९२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९५०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ७६ हजार ८०९ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६२.७४ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४८  हजार ५३७  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

आज निदान झालेले ९५०९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६० मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-११०५ (४९), ठाणे- २१७ (२), ठाणे मनपा-२८२ (१४),नवी मुंबई मनपा-४०० (८), कल्याण डोंबिवली मनपा-४०२ (१२),उल्हासनगर मनपा-४६ (२), भिवंडी निजामपूर मनपा-१४ (३) , मीरा भाईंदर मनपा-१९५ (७),पालघर-११३ (४), वसई-विरार मनपा-२०८ (१५), रायगड-२४७ (५), पनवेल मनपा-१४७, नाशिक-१०९, नाशिक मनपा-२७३ (८), मालेगाव मनपा-८, अहमदनगर-१६९ (७),अहमदनगर मनपा-१३६, धुळे-६३ (१), धुळे मनपा-६३ (३), जळगाव-१३४, जळगाव मनपा-१०९ (२), नंदूरबार-१३, पुणे- ४८५ (११), पुणे मनपा-१७६२ (२५), पिंपरी चिंचवड मनपा-७३४ (१५), सोलापूर-१५४(८), सोलापूर मनपा-३० (४), सातारा-२१५ (६), कोल्हापूर-११२ (२), कोल्हापूर मनपा-८५ (१), सांगली-१६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-३७ (४), सिंधुदूर्ग-२५, रत्नागिरी-९४, औरंगाबाद-४८ (२), औरंगाबाद मनपा-७४ (३), जालना-२८ (२), हिंगोली-१३ (२), परभणी-३, परभणी मनपा-१४ (१), लातूर-८३ (४), लातूर मनपा-५५ (७), उस्मानाबाद-८८ (२), बीड-८५, नांदेड-१२९, नांदेड मनपा-१२९ (१), अकोला-३ (३), अकोला मनपा-८ (२), अमरावती- १५ (२), अमरावती मनपा-७२ (१), यवतमाळ-६३ (१), बुलढाणा-४१ (१), वाशिम-३० (३), नागपूर-१०१ , नागपूर मनपा-१४४ (२), वर्धा-१८, भंडारा-५, गोंदिया-५, चंद्रपूर-२१, चंद्रपूर मनपा-६ (१), गडचिरोली-१४, इतर राज्य १२.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ५५ हजार ७०१ नमुन्यांपैकी ४ लाख ४१ हजार २२८ नमुने पॉझिटिव्ह (१९.५६ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २५ हजार २६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ९४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५३ टक्के एवढा आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post