जोपर्यंत शेतकरी आणि मजुरांच्या हातात पैसे येणार नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार नाही..


वेब टीम : दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनाआधीच भारतीय अर्थव्यवस्था संकटात होती, असे ते म्हणाले.जोपर्यंत शेतकरी आणि मजुरांच्या हातात पैसे येणार नाहीत तोपर्यंत अर्थव्यवस्थेत सुधारणा होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त छत्तीसगडमध्ये आयोजित कार्यक्रमाला राहुल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले.

ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

देशाची अर्थव्यवस्था समजून घ्यायची असेल तर देशात दोन अर्थव्यवस्था आहेत.

एक संघटित आणि दुसरी असंघटित. संघटित क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

तर असंघटित क्षेत्रात मजुरांचा समावेश आहे. काँग्रेस या दोन्ही अर्थव्यवस्था संतुलित करण्याचे काम करत आहे.

असंघटित अर्थव्यवस्था बळकट झाली तरच देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल, असे राहुल गांधी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post