निवडणूक आयोगाची घोषणा... 'या' जागेसाठी होणार पोटनिवडणूक


वेब टीम : दिल्ली
समाजवादी पक्षाचे नेते व खासदार अमर सिंह यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेतील जागेसाठी 11 सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.

या निवडणुकीसाठी 25 ऑगस्टला सूचना जारी करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

राज्यसभा सदस्य म्हणून जुलै 2022 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता.

अमर सिंह यांचे दीर्घ आजाराने एक ऑगस्टला निधन झाले होते.

राजकीय कारकिर्दीत अनेक वादांमध्ये अडकल्यानंतरही संकटमोचक म्हणूनच त्यांना ओळखले जात होते.

समाजवादी पक्षासाठी त्यांनी संकटाच्या काळात मोलाची भूमिका बजावली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post