कोविड सेंटर म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण... फडणवीसांचा हल्लाबोलवेब टीम : मुंबई

सरकारने उभारलेले ‘कोरोना सेंटर’ भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहेत. हा भ्रष्टाचार प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे आहे, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. 


ते म्हणाले – मार्च महिन्यात जेव्हा कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपविण्यात आले तेव्हा महाराष्ट्रात केवळ २६ रुग्ण होते. 


आजच्या ९ लाख २३ हजार ६४१ रुग्ण, त्यापैकी २ लाख ३६ हजार ९३४ अॅक्टिव्ह आहेत. 


२७ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राने सुरुवातीपासून कोरोनाशी नाही तर आकडेवारीशी आपली लढाई केली.


आकडे कसे लपविता येतील याचाच प्रयत्न सरकारने केला. सरकारने जे कोविड सेंटर उभे केलेत ते भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहेत. 


ते कुणाच्या फायद्यासाठी आहेत? कुणाच्या नातेवाइकांना कंत्राटे मिळाली आहेत, हे आम्ही बाहेर आणूच. 


मात्र सरकारने कोविड सेंटरमध्ये केलेला भ्रष्टाचार हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. 


सरकारने बांधलेल्या जम्बो कोविड सेंटरमधला मृत्युदर ३७ टक्के आहे. तिथे गेलेला प्रत्येक तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू होतो आहे.


ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. ‘नेस्को कोविड सेंटर’मध्ये भ्रष्टाचार झालेला असून ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला. खासगी रुग्णालयावर सरकारचा वचक नाही. 


औषधांचे बिल १० लाख दिले जाते. रोज ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन दिले तरी एवढे बिल होणार नाही. 


जो १० लाखांचे बिल देऊ शकतो, त्या रुग्णाला कुठेही बेड मिळतो. 


पण, ज्याकडे पैसे नाहीत अशा गरीब रुग्णाला कुठेही बेड मिळत नाही. डॅशबोर्डवर ‘बेड फुल्ल’ दिसतो. 


मात्र मागच्या दाराने पैसेवाल्यांना बेड मिळतो, अशी टीका फडणवीस यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post