मराठा आरक्षणावरून काही राजकीय नेत्यांना राजकारण करायचं आहे...वेब टीम : मुंबई

मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर भाजप – महाविकास आघाडीत आरक्षणावरून वाद पाहायाला मिळत आहे. 


फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण महाविकास आघाडी सरकारला कोर्टात टिकवता आले नाही. 


राज्य सरकारची रणनिती चुकली. 


विरोधी पक्षनेत्यांच्या या विधानानंतर मराठा आरक्षण समितीचे समन्वयक व महाविकास आघाडीचे मंत्री अशोक चव्हाण यांनी यावर प्रत्यूत्तर दिले आहे.


रणनीती चुकली हे फडणवीस सांगतात, जजमेंट वाचावं असे सांगत काही राजकीय नेत्यांना राजकारण करायचं आहे. असे अशोक चव्हाण म्हणाले. 


तसेच, आपण बाजू मांडण्यात कमी पडलोय हे देखील पाहायला हवे असे फडणवीस यांनी म्हटले 


त्यावर फडणवीस सरकारच्या काळातीलच वकील बाजू मांडण्यास होते असे उत्तर अशोक चव्हाण यांनी दिले आहे. 


तसेच शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे अध्यादेश काढण्याच्या मागणीबाबत विचार करू असेही अशोक चव्हाण म्हणाले. 


दरम्यान आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, 


मराठा समाजाला न्याय मिळवून देणारच असे शरद पवार म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post