कंगनाने मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करीलवेब टीम : मुंबई
लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. 

कंगना राणौतने मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकार वर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. 

कंगना यांनां भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. 

तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगन ला संरक्षण देईल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

शिवसेना सरकार मध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगनाला धमकी देणे योग्य नाही. 

कंगना यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणा वरून राज्य सरकार वर केलेली टीका असो याप्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही. 

कंगनाने मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post