निराशाजनक : देशाच्या जीडीपीत तब्बल २३ टक्क्यांची घसरण...वेब टीम : दिल्ली
लॉकडाउन'मुळे अर्थचक्र थंडावल्याने एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा "जीडीपी' दर तब्बल 23.9 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. 

या घरसणीमुळे मोदी सरकराने आता तरी आर्थिक मुद्यांना प्राधान्य द्यावी, अशी अपेक्षा विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे.  

याबाबतची अधिकृत आकडेवारी सोमवारी जाहीर करण्यात आली. कृषीवगळता उत्पादन, बांधकाम आणि सेवा यासह इतर सर्व क्षेत्रांनी तीव्र घसरण नोंदविल्याने देशाच्या एकूण "जीडीपी'ने "रिव्हर्स गिअर' टाकल्याचे दिसून येते. गे

ल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेने 5.2 टक्‍क्‍यांनी प्रगती केली होती, असे नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.

पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रातील एकूण मूल्यवर्धित (जीव्हीए) प्रगतीवर विपरीत परिणाम होऊन त्यात 39.3 टक्के घट झाली. 

गेल्या वर्षीच्या 3 टक्के वाढीच्या तुलनेत ही घसरण लक्षणीय ठरली आहे. तथापि, कृषी क्षेत्राने थोडासा दिलासा दिला आहे. 

गतवर्षीच्या पहिल्या तिमाहीतील 3 टक्‍क्‍यांच्या तुलनेत यंदा "जीव्हीए'मध्ये 3.4 टक्‍क्‍यांनी वाढ नोंदली गेली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post