वेब टीम : लेह लद्दाखमध्ये सुरू असलेल्या चीनच्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लद्दाखचा दोन दिवसांचा ...
वेब टीम : लेह
लद्दाखमध्ये सुरू असलेल्या चीनच्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लद्दाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला.
सैन्याच्या चीनला उत्तर देण्याच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, भारताचे लष्कर कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज आहे.
पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळची स्थिती बदलण्याबाबत चीनच्या करवाईंच्या पार्श्वभूमीवर, लद्दाखमधील सुरक्षाविषयक स्थितीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी लद्दाखचा दोन दिवसांचा दौरा सुरू केला.
आमचे अधिकारी आणि जवान जगातील सर्वोत्तम असून आम्ही फक्त लष्कर नाही तर देशालाही अभिमान वाटेल अशी कामगिरी करू, असे म्हणाले. मात्र, चर्चेतून वाद मिटेल असा विश्वास व्यक्त केला.
नरवणे म्हणाले की, “लेहमध्ये मी अनेक ठिकाणांना भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
जवानांचे मनोबल उंचावलेले असून सर्व आव्हानांचा सामना करण्यास ते समर्थ आहेत.
नियंत्रण रेषेवरील परिस्थिती थोडी तणावाची आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सैन्य तैनात करण्यात आले आहे.
यामुळे आपली सुरक्षा आणि अखंडतेचं रक्षण होईल.”
COMMENTS