पालघर साधू हत्याकांड: तपासात दोष, 'त्या' पोलिसांवर कारवाईवेब टीम : पालघर
16 एप्रिल 2020 रोजी मुंबईहून सुरतकडे निघालेले दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची  डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावातील वन विभागाच्या चौकीसमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती.

याप्रकरणी सुरुवातीला कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे आणि दोन पोलीस शिपायांना यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले आहे. 

त्यानंतर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. 

दरम्यान गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.

याप्रकरणी विभागीय चौकशी नवी मुंबई येथील विशेष महानिरीक्षक चौकशी करत होते 

त्यांनी . चौकशीअंती कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांच्या सह फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांच्या सह जवळपास १५ पोलिसांना कर्तव्यत कसूर केल्या प्रकरणी दोषी ठरविले आहे 

यात त्यांनी आनंद काळे याना बडतर्फ इले आहे.  तर  सह फोजदार रवी सांळुखे आणि कान्स्टेबल नरेश धोडी याना सक्तीने सेवा निवृत्त केले आहे 

याच बरोबर पोलीस कटारे याना उपनिरीक्षक पदाच्या वेतन श्रेणीवर २ वर्षे तसेच  पोलीस हवालदार संतोष मुकणे यांनाही २ वर्षे मूळ श्रेणी वेतन श्रेणीवर ठेवण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई शशिकांत कदम,सूरज कामडे ,मनोज सहारे याना शिपाईपदाच्या मुळ वेतन श्रेणीच्या  १ वर्ष ठेवण्यात येणार आहे. 

,बाबासाहेब जगताप अक्षय पऱ्हाडे ,आकाश आराक, गणेश घागस, अमित कुमार, कमलाकर पाटील, सूरज होवाळे , इसराईल सययद, राहुल  पंडागळे , श्रीराम फाजगे याना मूळ पदाच्या वेतन श्रेणीवर ३ वर्षे ठेवण्यात येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post