पत्रकारीतेतला 'पांडुरंग' हरपला..वेब टीम : पुणे

पत्रकार पांडुरंग रायकर हे श्रीगोंदा तालुक्यातील हंगेवाडी येथील सामान्य कुटुंबातील होते. 

कुटुंबात कुणीही सुशिक्षित नसल्याने शिक्षणाचा ध्यास घेत अत्यंत हालाकीची परीस्थिती असताना कठीण परीस्थितीत शिक्षण पुर्ण केले.

२००४ ते २००५ साली रानडे इन्ट्युटुट येथे पत्रकारीतेची पदवी घेतली होती. त्याकाळातच त्यांनी (लॉ) कायद्याची पदवी धारण केली. २

००६ ते २००७ साली पुणे येथे दै. केसरी या वर्तमान पत्रातुन पत्रकारीतेचा श्रीगणेशा केला. 

२००७ ते २००८ दै. सामना येथे काम केले. २००८ ते २०१२ साली हैद्राबाद येथे ETv मराठी या वृत्तवाहीनीचे प्रतिनिधीत्व केल त्यानंतर दै. तरुण भारत, दै.पुण्य नगरी मुंबई येथे उपसंपादक म्हणून काम पाहीले 

त्यानंतर मुंबईत ABP माझा या वृत्तवाहीत रुजु झाले. २०१४ साली यांची अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी म्हणुन नियुक्ती झाली. 

चार वर्ष त्यांनी अहमदनगर जिल्ह्यात ABP माझाचे प्रतिनिधीत्व केले. 

२०१८ साली ते पुणे येथील Tv9 मराठी या वृत्तवाहीनीत वरीष्ठ पत्रकार म्हणुन काम पहात होते. 

आज दिनांक २/९/२०२० रोजी पहाटे ५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या मागे पत्नी, आई, वडील, एक मुलागा एक मुलगी व तीन बहीणी असा मोठा परीवार आहे.

अत्यंत हसतमुख व प्रतेकाच्या मनात घर करुन राहणारे सर आज आपल्यात राहीले नाही. पत्रकारीतेच्या क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.

परमेश्वर त्यांच्या आत्मास चिरशांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post