संजय राऊतांनी कंगनाला सुनावले खडेबोल.. म्हणे, तुझं चंबूगबाळ आवर आणि जा तुझ्या राज्यातवेब टीम : मुंबई
कंगनाच्या मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणाऱ्या या ट्वीट संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘मुंबई पोलिसांवर अविश्वास तुम्ही दाखवता. 

कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल तर त्यांनी चंबू गबाळ आवरावे, आपल्या राज्यात जावे. हा काय तमाशा चालला आहे? 

पुढे ते म्हणाले की, ‘राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर ताबडतोब उत्तर दिले पाहिजे, मग ते कोणी असेल. 

या राज्यावर, पोलिसांवर विश्वास नाही. तुम्ही इकडे मीठ खाताय, ही तर बेईमानी आहे. 

अशा व्यक्तींच्या मागे राजकीय पक्ष उभे राहत असतील तर हीसुद्धा मोठी बेईमानी आहे. 

त्यामुले मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी हा विषय गांभीर्याने घेत अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे.’


सोशल मीडियावर चार वर्षापूर्वीची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल होत असून ही मुलाखत आहे अध्ययन सुमन म्हणजे शेखर सुमन यांच्या मुलाची. 

कंगना आणि अध्ययन रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या मुलाखतीत कंगना कशी अमली पदार्थाचे सेवन करत होती ते सांगितलं आहे. 

कंगना ‘हॅश’ या अमली पदार्थाचे सेवन करत होती असे तो सांगतो. तो म्हणतो की, ‘अमली पदार्थाचे सेवन हे कंगनासाठी नवे नाही. 


ती हॅश हा ड्रग घेत होती. माझ्यासमोर तिने घेतले आहे. ती कोकेनही घेत असावी. 

तिने कोकेन माझ्यासमोर घेतले नाही. पण हॅश ती घ्यायची. तिने मलाही खूपदा ऑफर केली आहे पण मी कधी घेतले नाही.’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post