भाजपनेही कंगनाच्या वक्तव्यावरून हात झटकले... म्हणे, राम कदमांच ते मत वैयक्तिकवेब टीम : मुंबई
अभिनेत्री कंगना रणौतनेे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . 

कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्व स्तरांवरून टीका करण्यात येत आहे. 

अशातच भाजप नेते राम कदम यांनी कंगनाची पाठराखण करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. 

यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे .

कंगनाच्या विधानाला भाजपसोबत जोडणे चुकीचे असल्याचेही शेलार म्हणाले. राम कदम यांचे कंगनाबाबतचे मतही वैयक्तिक असल्याचेही ते म्हणाले. या

वरून भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्यापासून भाजपने हात झटकले आहे . 

राम कदम यांनी झाशीच्या राणीशी कंगना रणौतची तुलना केली होती. मात्र अखेर भाजपला या प्रकरणातून हात झटकावे लागले. 

कंगना रणौत हिने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही, असे शेलार यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंह प्रकरणात वेगवेगळी वक्तव्ये करत प्रकरण संभ्रमित करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. कं

गना हिने मुंबई किंवा महाराष्ट्राबद्दल कोणतेही वक्तव्य करत शिकवण्याचा प्रयत्न करू नये. याबद्दल सहमत असण्याचा प्रश्नच येत नाही. 


कंगना हिच्यामागे राहून वार करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी करू नये. 

राम कदम यांच्या झाशीची राणी या कंगनाबद्दलच्या वक्तव्याबद्दल, ज्यांनी आपले व्यक्तिगत मत व्यक्त केले आहे, त्यावर ते खुलासा करतील, सर्व नागरिकांना सन्मानानं बघितलं पाहिजे. 

सन्मानाची भूमिका प्रत्येक व्यक्तीला बघण्याची असली पाहिजे. ही त्यांची भूमिका आहे त्याच्यात काही चुकीचे नाही, असे आशिष शेलार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post