खरं कारण आलं समोर.. 'या' कारणावरून झाला होता रिया आणि सुशांतमध्ये वादवेब टीम : मुंबई
रियाने सुशांतची बहीण प्रियांकासह इतर काही लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 

रियाने मुंबई पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. 

रियाने सुशांतची बहीण प्रियांका सिंह आणि राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्यासह इतर लोकांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. 

बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन तयार केल्याबद्दल तिने ही तक्रार दिली आहे. 

रियाने फसवणूक, एनडीपीएस अॅक्ट आणि टेली मेडिसिन प्रक्टिस गाइडलाइन्स 2020 अंतर्गत त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे. 

रियाचे वकील सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जूनला सुशांत सिंह राजपूतला त्याची बहीण प्रियांका सिंह हिने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरुण कुमार यांच्याकडून बनावट मेडिकल प्रिस्क्रिप्शन पाठवलं होतं. 

त्यामध्ये अशा औषधांचा समावेश होता जी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत येतात आणि त्यांच्यावर बंदी आहे. 

या प्रिस्क्रिप्शनवरूनच सुशांत आणि रिया यांच्यात वाद झाल्याचं रियाच्या वकिलांनी म्हटलं आहे. 

त्याची बहीण प्रियांकाने दिल्लीतून मेसेज पाठवला की, हे प्रिस्क्रिप्शन आहे. 

जेव्हा प्रिस्क्रिप्शन पाहिलं तेव्हा ते डॉक्टरांनी पाहिलं नसल्याचं दिसलं. याबाबत चर्चा झाली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post