उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे अडचणीत... तपासणी सुरु...

file photos


वेब टीम : मुंबई

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे अडचणीत आले आहेत. 


प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, 


त्यांचे पुत्र आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे तसेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची निवडणूक प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली आहे. 


यासंदर्भात तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. 


इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.


उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या मालमत्ता आणि कर्जाची पडताळणी करा. 


यासंदर्भात महिनाभरापूर्वी निवडणूक आयोगाकडे तक्रार आली होती. 


याबाबत एक स्मरणपत्रही पाठविण्यात आले होते, असे आयोगाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post