पेटीएमच्या ग्राहकांची धाकधूक वाढली... गुगलने प्ले स्टोअरवरून ऍप हटविले...



वेब टीम : दिल्ली

ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे ऍप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढले आहे. 


गुगलने या संदर्भात स्पष्टीकरण देताना या ऍपच्या माध्यमातून खेळां संदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही, असे म्हटले. 


त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही असे ही गुगलने स्पष्ट केले. 


गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली.


या संदर्भात पेटीएमने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 


या प्रकरणामध्ये चौकशीनंतर कंपनीकडून अधिकृतपणे पत्रक जारी करण्यात येणार आहे. 


हे अ‍ॅप्लिकेशन आता फक्त अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.


गुगलने या संदर्भात आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली. लाखो युझर्स असणाऱ्या पेटीएमवर कारवाई करण्यामागे कंपनीने ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे कारण दिले आहे. 


“आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. 


एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. 


अशा प्रकारच्या देवाण घेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.


“ज्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते अशा गोष्टींपासून आमच्या युझर्सचे संरक्षण व्हावे असे आमचे नियम आहेत. 


एखाद्या अ‍ॅपने याचे उल्लंघन केल्यास आम्ही त्या संदर्भातील नियमांची माहिती अ‍ॅपच्या डेव्हलपर्सला देतो. 


या संदर्भातील इतर कायदेशीर माहिती आणि नियम अ‍ॅप निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सांगितली जाते. 


मात्र बऱ्याचदा सांगितल्या नंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अ‍ॅपवर आम्ही कारवाई करतो. 


या संदर्भात आम्ही या कंपनीचे गुगल ‘प्ले डेव्हपर अकाऊंट’ बंद करण्यासारखी गंभीर कारवाईही करु शकतो. 


आपल्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या सर्व डेव्हलपर्सला हे नियम लागू होतात,” असे गुगलने म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post