देशात बेरोजगारी वाढली... 'या' संस्थेचा अहवालवेब टीम : दिल्ली 

देशात कोरोनाचे संकट असताना देशातील रोजगाराच्या संधी घटताना दिसत आहेत. 


‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’च्या (सीएमआयईई) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या अहवालात हे स्पष्ट झाले.


कोरोना व लॉकडाऊनमुळे देशात रोजगारानिर्मितील खिळ बसली होती. 


जून महिन्यात बेरोजगारी वाढल्याचे आकडेवारीतून दिसले होते. 


त्यानंतर जुलैमध्ये रोजगार निर्मितीचे दिलासादायक आकडे आले होते. 


मात्र, पुन्हा एकदा रोजगार निर्मितीत घट होत असल्याचे ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी’च्या अहवालातून समोर आले.


देशात जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रोजगारनिर्मिती घटली असून, यामुळे बेरोजगारी वाढली आहे. 


जुलैमध्ये बेरोजगारीचादर ७.४३ टक्के होता. ऑगस्टमध्ये तो ८.३५ इतका नोंदवला आहे.


ऑगस्टमध्ये शहरांमध्ये बेरोजगारीचा दर ९.८३ टक्के नोंदवला आहे. 


तर ग्रामीण भागात ७.६५ टक्के इतका होता. 


जुलैमध्ये बेरोजगारीचे प्रमाण शहरात ९.१५ टक्के तर ग्रामीण भागात ६.६ टक्के नोंदवले होते.


जूनमध्ये हे प्रमाण १२.०२ टक्के तर ग्रामीण भागातही बेरोजगारीचे प्रमाण १०.५२ टक्के होते. 


जुलैमध्ये यात थोडी घट झाली होती. पण,ऑगस्टमध्ये पुन्हा वाढ झाली. 


कोरोनामुळे देशाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी उणे २३.९ टक्क्यांनी घसरला आहे. 


हे चांगले संकेत नसल्याचे अर्थविश्लेषकांकडून सांगितले जात आहे. तर या परिस्थिती हळूहळू सुधारणा होईल, असे काही आर्थिक अहवालात म्हटले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post