मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य... मराठा आरक्षणाचा निर्णय उद्या किंवा पर्वा जाहीर होणार...वेब टीम : मुंबई

मराठा आरक्षण प्रकरणात सर्व पक्ष सोबत आहेत. यासाठी तज्ज्ञांशी संवाद सुरू असून आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या जवळ आलो आहोत. 


उद्या किंवा परवा याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. 


ते म्हणाले, सरकार मराठा समाजाच्या खंबीरपणे पाठीशी आहे. तसेच, मराठा आरक्षणाचा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतला होता.


आताही सगळे पक्ष मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. 


विरोधकांनीदेखील सरकारला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं सांगत सर्व पक्ष तुमच्यासोबत आहेत. 


त्यामुळे आंदोलनं करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला केलं आहे. 


दरम्यान, मराठा समाजासाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, मराठा समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेता राज्य सरकार मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करत आहे.


मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. 


परंतु पोलीस भरतीत १३ टक्के जागा ठेवण्याबाबत कायदेशीर बाब तपासून पाहणार, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post