एकेकाळचे गर्भश्रीमंत अनिल अंबानी म्हणतात.. मी कर्जबाजारी... बायकोच्या पैशांवर माझा खर्च चाललाय...वेब टीम : मुंबई

जगातील श्रीमंताच्या यादीत आघाडीवर असणारे अनिल अंबानी आता कर्जबाजारी झाले आहेत. त्यांची प्रतिमा हजारो कोटींच्या कर्जाने काळवंडली आहे. अंबानी यांच्यावर जवळपास १.७० लाख कोटींचे कर्ज असून चक्रवाढ व्याज, दंड झपाट्याने वाढत आहे. अंबानींच्या सर्वच कंपन्यांवर कर्जाचा डोंगर असून ही फेड न झाल्यास तुरुंगवासाची टांगती तलवार आहे. अनिल अंबानी यांची बँक शिल्लक केवळ २१ लाख रुपयांपर्यंत आला.एकेकाळी याच बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये ओसंडून वाहत होते. मात्र आता सर्व बँक खाती रिती झाली आहेत.त्यांच्यावर भारतातच नव्हे तर परदेशात खटले सुरु आहेत.


अनिल धीरूभाई अंबानी समूहावर (ADAG) २०१८ मध्ये १ लाख ७२ हजार कोटींचे कर्ज होते. २००८ मध्ये अंबानी यांच्या कंपन्यांचे बाजार मूल्य ४ लाख कोटी होते. ते २०१९ मध्ये २३६१ कोटींपर्यंत खाली आले. रिलायन्स इन्फ्रा, रिलायन्स एन्टरटेनमेन्ट या कंपन्यांची विक्री केली.काही मालमत्तांची विक्री करण्यास अंबानींना अडथळे आले. आठ अब्ज डॉलरच्या राफेल करारात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर अनिल अंबानी काँग्रेसच्या टिकेचे धनी झाले.


चीनमधील तीन बॅंकांनी थकबाकीमुळे लंडनमधील न्यायालयात अंबानी यांना खेचले आहे.’चायना डेव्हलपमेंट बॅंके’ने रिलायन्स कम्युनिकेशनला ९ हजार ८६० कोटींचे कर्ज दिले आहे.’एक्‍झिम बॅंक ऑफ चायना’ने अंबानी यांना तीन हजार ३६० कोटींचे कर्ज दिले असून ‘इंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बॅंक ऑफ चायना’ने १ हजार ५५४ कोटींचे कर्ज दिले आहे. या तीनही बॅंकांनी अनिल अंबानी यांनी वैयक्तिक हमी दिल्याचा दावा केला आहे.


अंबानी यांनी न्यायालयात सांगितले की, मी एक सामान्य जीवन जगत आहे. एकच गाडी वापरत आहे. आता पूर्वीसारखे माझे आयुष्य ऐश आरामाचे राहिले नाही. १ जानेवारी अखेर त्यांच्या बँक खात्यात २१ लाखांची शिल्लक असल्याची माहिती समोर आली. थोरला भाऊ एकीकडे यशाची शिखरे पादाक्रांत करताना धाकटा मात्र दिवाळखोरीत निघताना दिसत आहे.


अनिल अंबानी हे २००८ मध्ये सहावे सर्वाधिक श्रीमंत उद्योजक म्हणून गणले जात. मात्र अनिल अंबानी १० वर्षात इतके कर्जात बुडाले की स्वतःच्या कंपन्यांची विक्री करावी लागली. हे कमी की काय तर कोर्ट केसेसचा खर्चासाठी त्यांनी मागील सहा महिन्यात पत्नीचे ९.९० कोटींचे दागिने विकले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post