सुशांतसिंग प्रकरणात ज्यांनी ज्यांनी दात उचकटले त्यांचे दात घशात घालू...वेब टीम : मुंबई

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात भाजप नेत्यांकडून राज्याचे पर्यटन मंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला होता. 


यावर "ज्यांनी ज्यांनी या प्रकरणात दात उचकटले होते, 


त्यांचे दात लवकरच घशात जातील याची मला खात्री आहे," 


अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला. 


पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


ते पुढे म्हणाले की, "शिवसेनेच्या केसालाही धक्का लागला नाही. 


ज्यांच्यावर आरोप झाले ते पक्षाचे प्रमुख नेते आहे. 


त्यांच्यावर चिखलफेक केली तरी काही झालं नाही. 


आता आम्ही सीबीआयच्या अहवालाची वाट पाहतोय."

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post