राफेल लढाऊ विमानांच्या सुरक्षिततेला धोका... 'हे' आहे कारण..वेब टीम : अंबाला

या विमानतळाच्या परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी भारतीय हवाई दलाने हरयाणा सरकारला तात्काळ उपायोजना करण्याची विनंती केली. 


या कचऱ्यामुळे एअर फोर्स तळाच्या परिसरात मोठया प्रमाणात पक्षी येतात. 


या पक्ष्यांमुळे हवाई दलात नव्याने समावेश केलेल्या ‘राफेल’ लढाऊ विमानांच्या सुरक्षिततेला धोका आहे. 


या संदर्भातील वृत्त एका खासगी वृत्तसंस्थेने दिले.


त्यामुळे आयएएफचे निरीक्षण आणि सुरक्षा महानिर्देशक एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांनी या संदर्भात हरयाणाचे मुख्य सचिव आनंद अरोडा यांना पत्र लिहिले. 


“२९ जुलैला अंबाला तळावर दाखल झालेल्या राफेल विमानाच्या सुरक्षेवर आयएएफचे सर्वाधिक लक्ष आहे” असे पत्रात म्हटले आहे.


“अंबाला एअर फोर्स स्टेशनवर मोठया प्रमाणावर पक्षी जमा होतात. 


एखाद्या वेळी या पक्ष्याची विमानाबरोबर धडक झाली, तर मोठे नुकसान होऊ शकते” असे पत्रात म्हटले. 


विमानतळ परिसरात जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे तिथे पक्ष्यांचे उड्डाण सुरु असते. 


कचरा हटवण्यासाठी बरेच उपायोजना सुचवण्यात आल्या आहेत. 


या संबंधी अंबाला एअर फोर्स स्टेशनवरील अधिकाऱ्याने सह आयुक्त आणि अंबालाच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची भेट घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.


लढाऊ विमानांच्या सुरक्षेसाठी छोटया आणि मोठया पक्षांना एअरफिल्डपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. 


अंबाला एअर फिल्डच्या १० किलोमीटरपर्यंतच्या परिसरात एअर फोर्सने सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट योजनेची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन मोठया पक्ष्यांचा वावर कमी होऊ शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post