फडणवीस - संजय राऊत भेट... शरद पवार म्हणाले... हे सरकार...वेब टीम : पंढरपूर

शिसवेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वातावरणात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत . 


याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली . 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा़ शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते


खासदार संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. 


त्याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व भाजपच्या नेत्यांची मुलाखत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. 


यामुळे या भेटीला राजकीय अर्थ नाही. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे टिकणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.


राऊत आणि फडणवीस याच्या भेटीनंतर महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले . 


महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. 


त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे त्यांनी म्हटलं आहे. त्यावर पवारांनी प्रतिउत्तर दिले आहे .


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post