एअरपोर्टवर गर्दी गोळा करून स्वत:ला लाईम लाइटमध्ये ठेवण्याचा कंगनाचा प्रयत्नवेब टीम : मुंबई

प्रत्येक वेळी सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्य करून खळबळ उडणवणे, ही मानसिक विकृती आहे. 


मात्र, या विकृतीमागे कोणाचं तरी डोकं आहे, याची आम्हाला कल्पना आहे.


 एअरपोर्टवर गर्दी गोळा करून स्वत:ला लाईम लाइटमध्ये ठेवण्याचा कंगनाचा प्रयत्न असल्याचे अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.


तसेच एखाद्या मनोरुग्णालयात कंगनावर उपचार करायला हवा आणि तिच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करावा, अशा दोन मागण्याही अमेय खोपकर यांनी केल्या आहेत.


कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईलमध्ये स्वागत करण्यात कार्यकर्ते उत्सुक असतील, असं काहींना वाटलं असेल; 


मात्र कोणाला किती महत्त्व द्यायचं, हे आम्ही राज ठाकरे यांच्याकडून शिकलो आहोत, असे वक्तव्य अमेय खोपकर यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post