चिन्यांची मुजोरी कायम... सीमेवर केला गोळीबार आणि म्हणे भारतानेच केला गोळीबारवेब टीम : दिल्ली

चीनचा उद्दामपणा सुरूच आहे! चीनने पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला. इतकेच, नव्हेतर गोळीबारही केला. 


यानंतर, भारताकडूनच गोळीबार करण्यात आला, असा कांगावाही केला. 


भारतीय लष्कराने हा दावा खोटा ठरवत चीन जगाची दिशाभूल करीत असल्याचे सांगितले. 


प्रत्यक्षात चीनच्या सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. 


तसेच, भारतीय जवान उपस्थित असलेल्या ठिकाणांच्या दिशेने हवेत अंदाधुंद गोळीबार केला, असे भारतीय लष्कराने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 


शांततेसाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चा सुरु असताना आंतराराष्ट्रीय करारांचा भंग करून चिनी सैन्याकडून आक्रमक कारवाया केल्या जात आहेत, अशी टीकाही निवेदनात केली आहे.


प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 7 सप्टेंबरच्या रात्री पीपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) सैन्य भारतीय चौकीच्या दिशेने पुढे येण्याचा प्रयत्न करत होते. 


भारतीय जवानांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता चिनी सैनिकांनी गोळीबार केला. 


चिनी सैनिकांच्या या चिथावणीखोर कृत्यानंतरही भारतीय जवानांनी संयमाचे पालन करून आपल्या चौक्यांचे संरक्षण करण्याचे धोरण अवलंबिले, असे निवेदनात म्हटले आहे.


भारतीय सैन्य शांतता आणि विश्वासार्हता यासाठी ओळखले जाते. 


मात्र, देशाच्या अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही लष्कराच्या वतीने देण्यात आली आहे. 


चीनकडून जगाची दिशाभूल करण्यासाठी चुकीची विधाने केली जात आहेत, असेही लष्कराने म्हटले आहे.


त्याआधी, चीनने म्हटले होते की, भारतीय जवानांनी पांगोंग सरोवराच्या दक्षिणेकडील भागावर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करत हवेत गोळीबार केला. 


भारतीय जवानांनी शेनपाओ परिसरातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली आणि जेव्हा चिनी गस्त घालणारे पथक भारतीय जवानांशी बोलणी करण्यासाठी पुढे सरसावले 


तेव्हा त्यांनी हवेत गोळ्या झाडल्या. भारताने हा मुद्दा खोडून काढत चीनचा पुन्हा एकदा बुरखा फाडला.


दरम्यान, 20 ऑक्टोबर 1975 रोजी चीनने अरुणाचल प्रदेशच्या तुलुंग घुसखोरी करून भारतीय गस्त पथकावर हल्ला केला. 


यात 4 जवान शहीद झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post