कंगना अडचणीत.. विधिमंडळ अधिवेशनात झालं 'असं' काही...वेब टीम : मुंबई

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी केल्याच्या वक्तव्यांबाबत आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात अभिनेत्री कंगना रणौत हिच्याविरुद्ध गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निषेधाचा ठराव मांडला.


सोमवारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना रणौतवर कारवाई करावे असे पत्र दिले होते. 


या पत्रात मुंबईची बदनामी करणाऱ्या कंगनावर कारवाई करा, अशी मागणी केली होती. 


मुंबईत परप्रांतीय मुलगी येते, नाव कमावते आणि महाराष्ट्र मुंबईचा अपमान करत, असे बेताल आणि खेदजनक वक्तव्य करते.


महाराष्ट्राची बदनामी सहन करणार नाही, मुंबई पोलीस यांची बदनामी सहन करणार नाही, असे अनिल देशमुख म्हणाले. 


या प्रस्तावाला समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांनी पाठिंबा दिला.


कंगना रणौत हिच्या विरोधात महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी हक्कभंग आणला आहे. 


मी ड्रग्ज घेतले होते, असे कंगनाने एका मुलाखतीत सांगितले होते. अशा महिलेने महाराष्ट्राबद्दल बेताल वक्तव्य केले आहे. 


मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या परंपरेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. 


अशा महिलेच्या विरोधात हक्कभंग आणत असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post