क्रूरकर्मा हुकूमशाहा किम जोंग उनने दहा दिवसात उभारले अत्याधुनिक गाव...वेब टीम : दिल्ली

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्याबद्दल नेहमी हिंसक किंवा विचित्र निर्णयाच्या बातम्या येत असतात. 


पण यावेळची बातमी वेगळी आहे. ऊन यांच्या आदेशाने केवळ १० दिवसात सर्व सोईंनी युक्त गाव उभारण्यात आले आहे.


याच महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाच्या कुमचॉन काऊंटीमध्ये कंगबुक री भागात प्रचंड वादळ आले. 


१ हजारपेक्षा जास्त गावे उद्ध्वस्त झाली. हजारो लोक बेघर झाले. 


देशाचे राज्यकर्ते किम जोंग उन यांनी लष्कराच्या अभियांत्रिकी विभागास बेघरांसाठी कंगबुक रीमध्ये आधुनिक गाव वसविण्याचा आदेश दिला.


लष्करातील अभियंत्यांनी या गावातील पडलेल्या घरांचे अवघ्या दहा दिवसांत बांधकाम पूर्ण केले. गावाला अगदी आधुनिक स्वरूप दिले.


किम जोंग यांनी या कामाची पाहणी केली. हृांगे प्रांताचे प्रशासन चांग हो यांनी गुरुवारी या गावाचे लोकार्पण केले. 


सरकारी माध्यमांनी याची छायाचित्रे जारी केली आहेत. बऱ्याच दिववसात उन यांनी जनहिताचा असा उल्लेखनीय राबवल्याची बातमी आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post