देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरही त्यांचा नावलौकिक होत आहेवेब टीम : मुंबई

खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरुन राजकारण तापलं आहे. 


या भेटीविषयी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'सामना'तील मुलाखत घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 


मात्र यावेळी बिहार निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 


तसंत फडणवीस यांची मुलाखत अन एडिटेडच असेल, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.


दरम्यान फडणवीस यांच्यासोबतच्या मुलाखतीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. 


ती ठरवण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा भेटू, असंही संजय राऊत नमूद केलं.


संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरही त्यांचं नावलौकिक होत आहे. 


तरुण नेत्याला आपली मतं मांडता येतील. देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत नक्कीच घेणार आहे. 


याआधी शरद पवार यांचीही मुलाखत घेतली होती. भविष्यात राहुल गांधी, अमित शाह यांचीही मुलाखत घेणार आहे.""मी फ्रीडम ऑफ स्पीच मानणारा व्यक्ती आहे. 'सामना'च्या सर्व मुलाखती अन एडिटेडच असतात. 


फडणवीस यांची मुलाखतही 'अन एडिटेड असेल. देवेंद्र फडणवीस जे बोलतील ते सगळ्यांसमोर असेल, 


मग आमच्यावर टीका असो किंवा इतर काही, मुलाखत अनकटच असणार," असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post