चीनसाठी पाकिस्तान म्हणजे झाली प्रयोगशाळा... कोरोनाच्या लसीची करणार चाचणीवेब टीम : बीजिंग

करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


काही लशींची चाचणी तिसऱ्या टप्प्यात आली आहे. चीनमधील कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीची चाचणी पाकिस्तानसह चार देशांमध्ये होणार आहे.


चायना नॅशनल बायोटेक ग्रुप (सीएनबीजी) आणि सिनोव्हॅक बायोटेक लिमिटेड यांनी तयार केलेल्या करोना विषाणूवरील लशींची मानवी चाचणी पाकिस्तानसह इतर चार देशांमध्ये होणार आहे. 


सध्या लस स्पर्धेत चीन आणि ब्रिटनची ऑक्सफर्डने विकसित केलेली लस आघाडीवर आहे.


सर्बिया आणि पाकिस्तान यांच्यासह तुर्की आणि बांगलादेशने तयारी दर्शवली आहे. 


आणखी काही देश चाचणीत सहभागी होण्याची शक्यता आहे. 


चीनमधील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने त्यांच्या लशीची चाचणी देशवासीयांवर करणे अवघड होत आहे. 


त्यामुळे चिनी कंपन्या इतर देशांकडून चाचणीसाठी माहिती मागवित आहेत. त्याला आता आणखी चार देशांनी प्रतिसाद दिला आहे. 


'सीएनबीजी'च्या दोन नमुन्यांची आणि 'सिनोव्हॅक'च्या एका नमुन्याची चाचणी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांसारख्या ठरावीक समूहावर करण्यास चीनने परवानगी दिली आहे.


सर्बिया 'सीएनबीजी'च्या दोन्ही नमुन्यांची चाचणी घेणार आहे. लशीच्या तिसऱ्या टप्प्यात सुमारे दहा देशांतील ५० हजार नागरिकांवर चाचणी घेण्यात येणार आहे. 


संयुक्त अरब अमिराती, बहारिन, मोरोक्को, जॉर्डन, पेरू, अर्जेंटिना आणि जॉर्डन येथे लशीची चाचणी सुरू झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post