पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर छापेमारी; दहशतवाद्यांना अटकवेब टीम : कोलकाता

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापेमारी करत मोठी कारवाई केली. 

 

एनआयएने पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील बऱ्याच ठिकाणांवर छापे टाकले. 


या दरम्यान दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या ९ दहशतवाद्यांना अटक झाली. 


एनआयएने पश्चिम बंगालमधून सहा तर केरळमधून तीन जणांना अटक केली.


दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणे, काही कागदपत्रे, जिहादी साहित्य, हत्यारे, देशी हत्यारे आणि स्फोटके तयार करण्याची कागदपत्र आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली. 


एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी अल कायदाच्या आंतरराज्यीय मॉड्यूल बाबत माहिती मिळाली होती. 


ही संघटना भारतातील बऱ्याच महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहिती मिळाली आहे.


“सुरूवातीला या लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अल कायदाच्या दहशतवादी संघटनेद्वारे कट्टरतावादी बनवण्यात आले. 


तसेच दिल्लीसहित अन्य राज्यांमध्ये हल्ले करण्यास प्रवृत्त केले. यासाठी मॉड्यूल सक्रियपणे पैसे जमवत होते. 


तसेच हत्यारे आणि स्फोटके खरेदी करण्यासाठी काही दहशतवादी दिल्लीला जाण्याचीही योजना आखत होते,” असे एनआयएकडून सांगण्यात आले.


मुर्शीद हसन, याकूल बिस्वास, मोर्शफ हुसैन, नजुस साकिब, अबू सूफियान, मैनुल मंडल, लियू यीन अहमद, अल मामून कमाल आणि अतितुर रहमान अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post