बापलेकीच्या नात्याला काळिमा; पोटच्या मुलीवर नराधम बापाकडून अत्याचार...वेब टीम : मुंबई

मुंबईतील गोरेगावमध्ये बापलेकिच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. 


अवघ्या आठ वर्षांच्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नराधम बापाला अटक केली आहे. 


घटनेनंतर आरोपी बापाने मुलीला काठीने मारहाण केली. तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी त्याने दिली होती.


रिपोर्टनुसार, ऑगस्टमध्ये ३२ वर्षीय पित्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. २२ सप्टेंबरपर्यंत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले. 


मारहाण केल्याने आणि धमकावल्याने मुलगी घाबरलेली होती. अखेर अत्याचाराला वैतागून तिने मंगळवारी आपल्या आईला याबाबत सांगितले. 


आईने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. 'मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून आम्ही आरोपीला तात्काळ अटक केली आहे,' अशी माहिती बांगुर नगर पोलिसांनी दिली. 


बांगुर नगर पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.


मुंबईतील खारमध्येही २३ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४५ वर्षीय बापावर गुन्हा दाखल केला आहे. 


पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचा बाप रोज दारू प्यायचा. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो आई आणि तिच्यासोबत भांडण करत असे. 


१८ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास आरोपी दारू पिऊन घरी आला. 


तासाभरानंतर ज्यावेळी तरुणी बाथरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपीही तिथे आला आणि त्याने विनयभंग केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post