सोने- चांदीची झळाळी उतरली... भावामध्ये घसरण...वेब टीम : दिल्ली

जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या दरात नरमाई आली असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारात बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.


वायदे बाजारात सोन्याचे प्रति १० ग्रॅमचे दर २६६ रुपयांनी कमी होऊन ५० हजार ३८६ रुपयांवर आले आहेत. 


तर दुसरीकडे चांदी दरात एका किलोमागे १४०० रुपयांची घट होऊन चांदी ६१ हजार ७० रुपयांवर आली आहे. 


जागतिक बाजारात सोन्याचे प्रति औंस दर १८९० डॉलर्सवर स्थिर आहेत. 


गेल्या काही दिवसांत सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. 


आता दरात घसरण होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post