IPL 2020 : RR vs KXIP : राहुल तेवतियाने पंजाबला धू-धू धुतले... राजस्थानचा ४ विकेटने विजयवेब टीम : शारजाह

आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात राजस्थानच्या राहुल तेवतियाने पंजाबला धू-धू धुतले.


राहुलच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने पंजाबचा ४ विकेट्सने पराभव केला.


Kings Eleven Punjab ने  राजस्थान रॉयल्सला Rajasthan Royals विजयासाठी 224 धावांचे तगडे आव्हान दिले होते. 


कर्णधार लोकेश राहुल आणि मयंक अगरवाल यांच्या 183 धावांच्या सलामी भागीदारीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 223 धावा केल्या. 


पंजाबकडून मयंक अगरवालने सर्वाधिक 106 धावा केल्या. 


मयंकने 45 चेंडूत आपले शतक पूर्ण केल. मयंकने आपल्या 106 धावांच्या खेळीत 7 सिक्स आणि 10 फोर लगावले. 


तर कर्णधार लोकेश राहुलने दमदार अर्धशतक लगावले. लोकेश राहुलने 69 धावा केल्या. 


ग्लेन मॅक्सवेलने 13 तर निकोलस पूरनने नाबाद 25 धावा केल्या. 


राजस्थानकडून अंकित राजपूत आणि टॉम करनने प्रत्येकी 1 बळी घेतला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post