मोदीजी, तुम्ही चीनच्या विरोधात कधी उभे राहणार..? राहुल गांधींचा सवालवेब टीम : दिल्ली

देश नेहमीच लष्कराच्या पाठीशी उभा आहे. पण, मोदीजी, तुम्ही कधी चीनच्या विरोधात उभे राहणार?


चीनच्या ताब्यातून भूमी परत कधी घेणार? चीनचे नाव घेण्यास भिऊ नका, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. 


पंतप्रधान मोदी यांनी चीनच्या घुसखोरीवरून देशाची दिशाभूल केली, हे संरक्षण मंत्र्यांच्या विधानावरून स्पष्ट झाले आहे, असे ट्विट राहुल यांनी केले.


दुसरीकडे, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनीही ट्विट करून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. 


’राजनाथ सिंहजी, देश सैन्याच्या पाठीशी एकजुटीने उभा आहे. 


पण, चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा करण्याचे धाडस कसे केले, हे सांगा? असे त्यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post