हाथरस अत्याचार प्रकरण : रामदास आठवले भेटणार योगी आदित्यनाथांना...वेब टीम : मुंबई

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. 


या बातमीने दुःख झाले . दलित पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून 


यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटणार असल्याची माहिती रामदास आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली . 


तसेच आरोपीना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आठवले यांनी केली आहे .


१४ सप्टेंबर रोजी जनावरांसाठी चारा आणण्यासाठी ही तरुणी आपल्या शेतात गेली होती. 


याठिकाणी चार तरुणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. 


रक्तबंबाळ अवस्थेत जेव्हा ही तरुणी घटनास्थळी आढळून आली तेव्हा तिची जीभ छाटलेली होती 


तसेच तिच्या मानेवर गंभीर जखमा होत्या. त्याचबरोबर तिच्या पाठीच्या कण्यालाही गंभीर दुखापत झाली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post