शेतकऱ्यांसाठी खुशखबर... 'या' तारखेपासून मॉन्सूनचा परतीचा प्रवास होणार सुरु...वेब टीम : पुणे

यंदा राज्यासह देशभरात समाधानकारक पाऊस पडला आहे. 


पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने यावेळी मान्सूनच्या परतीचा प्रवास सुमारे 10 ते 10 दिवसांनी लांबला होता. 


मात्र (सोमवार) पासून पश्चिम राजस्तानातून मान्सूनचा परतीच्या प्रवासाला प्रारंभ होणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने शनिवारी स्पष्ट केले.


दर वर्षी 17 सप्टेंबरपर्यंत मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात होत असते. मात्र यंदा परतीचा प्रवास लांबणीवर पडला होता. मात्र आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक वातावरण तयार झाले आहे. 


राजस्तानातून परतीच्या प्रवासाला सुरूवात झाल्यानंतर देशातून टप्याटप्याने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. 


परतीच्या प्रवासातही ठिकठिकाणी वादळ वार्‍यासह पाऊस पडत असतो. 1 जूनपासून 17 सप्टेंबरपर्यंत पडलेला पावसाची नोंद केली जाते. 


तो पाऊस हंगामातील पाऊस गृहित धरतात. मात्र परतीच्या पावसाची हंगामी पावसात नोंद केली जात नाही.


यंदा 1 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता. 14 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. तर 26 जूनपर्यंत संपूर्ण देश मान्सूनने व्यापला होता. 


यंदाच्या हंगामात राज्यासह संपूर्ण देशातच पाऊस पडला. आणखी परतीच्या प्रवासातही बर्‍याच ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. 


त्यामुळे परतीच्या प्रवासातही विविध प्रकारच्या पीकांना पावसाचा फटका बसणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post