'सॅमसंग'ने बाजारात आणला 7000mAhची दमदार बॅटरी असलेला Galaxy M51.... आहेत 'अशी' फीचर्स जी तुम्हाला करतील 'फिदा'



वेब टीम : मुंबई

सॅमसंग त्यांच्या लोकप्रिय Galaxy M स्मार्टफोन मालिकेत नवा पर्याय आणला असून या Galaxy M51 मध्ये तब्बल 7000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 


एव्हढी बॅटरी असणारा हा भारतातला पहिलाच फोन असणार आहे. 


शिवाय अनेक महिन्यांच्या मागणीनंतर शेवटी सॅमसंगने त्यांच्या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 730G प्रोसेसर दिला आहे. 


या फोनची किंमत २४९९९ आणि २६९९९ अशी असणार आहे व हा फोन १८ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर मिळेल. 


१८ ते २० सप्टेंबर दरम्यान खरेदी केल्यास खास HDFC बँक ग्राहकांना 2000 रुपये सूट देण्यात येणार आहे.


या फोनमध्ये 64MP कॅमेरा असून यासोबत Single Take नावाची सोय देण्यात आली आहे ज्यामुळे हा फोन एकावेळी एक क्लिकवर अनेक फोटो काढतो 




ज्यामधून आपण आपल्याला आवडलेला फोटो निवडू शकतो! 


फोनमध्ये quad कॅमेरा सेटअप असून 12MP अल्ट्रावाईड, 5MP डेप्थ लेन्स आणि 5MP मॅक्रो लेन्स मिळेल. 


फ्रंट कॅमेरा 32MP असणार आहे. या फोनचं वैशिष्ट्य असणारी 7000mAh बॅटरी पॉवरबँक प्रमाणेही वापरता येते.


त्यासाठी त्यांनी बॉक्समध्ये Type C केबल सुद्धा दिली आहे!


Samsung Galaxy M51खरेदी करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा  https://amzn.to/3koekjA

Samsung Galaxy M51 Specifications

डिस्प्ले : 6.7″ sAMOLED Plus Infinity O Display

प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730G

GPU : Adreno 618

रॅम : 6GB/8GB

स्टोरेज : 128GB + Expandable with microSD card upto 512GB

कॅमेरा : 64MP Sony IMX682 Quad Camera + 12MP Ultrawide + 5MP depth lens + 2MP Macro Lens

फ्रंट कॅमेरा : 32MP SONY IMX616

बॅटरी : 7000mAh 25W Fast Charge with reverse charging

ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI based on Android 10

इतर : GPS, 802.11 a/b/g/n/ac, Bluetooth 5.0, NFC, Side Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot

सेन्सर्स : accelerometer, ambient light sensor, compass/magnetometer, gyroscope, proximity sensor

रंग : Celestial Black, Electric Blue

किंमत : हा फोन १८ सप्टेंबर दुपारी १२ पासून अॅमेझॉनवर उपलब्ध होत आहे.

Samsung Galaxy M51 Price

6GB+128GB ₹24999

8GB+128GB ₹26999

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post