शरद पवारांनी घेतली अधिकाऱ्यांची 'शाळा'...वेब टीम : पुणे

पुण्यातील कोरोना स्थिती आवाक्याबाहेर जात असल्याची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली आहे. 


बिघडलेल्या स्थितीला नेमके कोण जबाबदार आहे? प्रशासन कुठे चुकते आहे का? 


आयसीएमआरच्या नियमांचे उल्लंघन होत नाही ना? या मुद्द्यांवरून पवार यांनी शुक्रवारी स्थानिक प्रशासनाची ‘शाळा’ घेतली. 


त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेत गरजू रुग्णांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरण्याची सूचना केली.


पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड, जिल्हा आणि पुणे विभागातील कोरोनास्थितीचा आढावा पवार यांनी घेतला. 


कोरोनाला लगाम घालण्याच्या उद्देशाने राज्य सरकारच्या यंत्रणांसह महापालिका उपाय करीत आहे. 


तरीही गेल्या काही दिवसांत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. 


पवार यांनी बारामती हॉस्टेलमध्ये विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी चर्चा केली. 


कोरोनावरील जुन्या-नव्या उपायांवर फारशी चर्चा न करता पुण्यात नेमके काय चालले आहे? 


सध्याच्या परिस्थितीवर कोणाचे नियंत्रण आहे? खरोखरीच परिस्थिती आटोक्यात आहे का? या मुद्द्यांवर पवार यांचा भर होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post