सुशांतची एक्स मॅनेजर दिशावर झाला होता सामूहिक बलात्कार...?वेब टीम : मुंबई

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्युबाबत एक मोठा खुलासा पुढे आला आहे. 


त्या दिवशीच्या पार्टीतील एका प्रत्यक्षदर्शीने हा खुलासा केला आहे. 


पार्टीत दिशावर सामुहीक बलात्कार केल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. 


त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असंही त्याने सांगितलं.


त्याने सांगितले की, पार्टीमध्ये एकूण सहा जण उपस्थित होते. 


दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित होता. चार जणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. 


दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती.


त्याने न्यूज नेशन वृत्तवाहीनीकडे हा खुलासा केला. 


दिशाचा ८ जून रोजी मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला.


सुशांतसिंहच्या मृत्युची चौकशी सीबीआयकडे गेल्यानंतर दिशाच्या मृत्युबाबत अनेकांनी संशय व्यक्त केला. 


सुशांत आणि दिशाच्या मृत्युचे कनेक्शन असल्याचेही सांगितले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post