सोशल मीडियावर मोदीजी झाले ट्रोल.. नेटकरी म्हणाले, रिकाम्या बोगद्यात कुणी हात हलवत का?वेब टीम : दिल्ली
पंतप्रधान मोदी शनिवारी हिमाचलमधील अटल बोगद्याचे उद्घाटन केलं. 

हा बोगदा समुद्रसपाटीपासून १० हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे. 

मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे ४६ कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे. 

पंतप्रधान मोदींबरोबरच या सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित होते. मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित राहलेल्या पंतप्रधान मोदींच्या एका कृतीवरुन सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे.  


मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणाऱ्या या ९.०२ कि.मी. लांबीच्या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मोदी हे रिकाम्या बोगद्यामध्ये कोणीही नसताना कोणाला हात उंचावून दाखवत होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

पीर पांजाल पर्वतराजीत ३ हजार मीटर म्हणजे १० हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधणी करण्यात आलेल्या या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी पोहचलेले पंतप्रधान बोगद्यामधून जाताना हात उंचावून अभिवादन करत होते. 

मात्र बोगद्यामध्ये कोणीच नव्हते तर मोदी नक्की कोणाला हात करत होते असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. हा प्रश्न उपस्थित करणारे अनेक ट्विट फोटो आणि व्हिडिओंसहीत पोस्ट करण्यात आले आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post