जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोतवेब टीम : मुंबई
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयाकडून सीबीआयकडे सोपवण्यात आलेल्या रिपोर्टवरून, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपावर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. 

जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

“अगदी सुरुवातीपासूनच या प्रकरणात महाराष्ट्र सरकार व मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. 

जर आता सीबीआय चौकशीवरही विश्वास ठेवला जात नसेल, तर मी आम्ही नि:शब्द आहोत. एम्स फॉरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख असेलल्या डॉ. सुधीर गुप्ता यांचा हा रिपोर्ट आहे. 

ज्यांचा कोणताही राजकीय संबंध नाही किंवा शिवसेनशी देखील संबंध नाही.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे सोपवलेल्या अंतिम रिपोर्ट मध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला व सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post