'आगीतून फुपाट्यात'.... अनिल अंबानींना केंद्र सरकारचा झटका....वेब टीम : दिल्ली

अनिल अंबानी यांच्या अनिल धीरुभाई अंबानी समूहाला देण्यात आलेले २५०० कोटींचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाने रद्द केले आहे. 


आर्थिक संकटात सापडलेले अनिल अंबानी यांना हा आणखी एक मोठा झटका आहे. 


रिलायन्स नेवल अँड इंजिनीअरिंग लिमिटेड (आरएनईएल) आरएनईएल भारतीय नौदलाला गस्तीसाठीची जहाजे तयार करून देणार होती. 


‘आरएनईएल’ला नियोजित वेळेत ही जहाजे देता आली नाहीत. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने आरएनईएल कंपनीचे कंत्राटच रद्द केले. 


सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने दोन आठवड्यांपूर्वीच या निर्णयावर शिक्कामोर्तब केले होते.


नौदलाला गस्तीसाठीची पाच जहाजे पुरवण्याच्या हा करार रिलायन्स आणि नौदलामध्ये २०११ साली झाला होता. 


यानंतर रिलायन्सने गुजरातमधील जहाज बांधणीचा कारखाना खरेदी केला होता. पण नंतर रिलायन्स उद्योगाची गाडी घसरत गेली. 


दिवाळखोरीच्या मार्गावर अनिल अंबानी यांच्या मालकीच्या इतर कंपन्यांप्रमाणे रिलायन्स नेवल अँड इंजिनीअरिंग  लिमिटेडही (आरएनईएल) कर्जाच्या मोठ्या ओझ्याखाली दबलेली आहे. 


राष्ट्रीय कंपनी लवादाने ‘आरएनईएल’च्या दिवाळखोरी प्रक्रियेला मंजुरी दिली होती. या कंपनीच्या डोक्यावर सुमारे ४३,५८७ कोटींचे कर्ज आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post