कुणाल कामराने संजय राऊतांना दिला जेसीबी भेट... कंगनाला डिवचलेवेब टीम : मुंबई

स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना जेसीबी भेट दिला आहे. 


कुणालच्या ‘शटअप या कुणाल’ शोचे संजय राऊत यांच्यासह शूटिंग आज पार पडले. 


त्यावेळी कामराने जेसीबीची खेळणी भेट देत एकप्रकारे कंगनाला डिवचले आहे.
‘संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, 


तरच मी पुन्हा सुरू करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’ असं ट्विट  कुणाल कामराने केले होते.


त्याला प्रतिसाद देत राऊत यांनी शो मध्ये सहभागी होण्याचे मान्य केले होते.


महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. 


या पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या निमित्ताने मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणारे राऊत आता मुलाखत देताना दिसणार का , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर बीएमसीने जेसीबी आणून कारवाई केली होती.


आता कामराने राऊत यांना जेसीबी भेट दिल्याने कंगनाचा चांगलाच तिळपापड होणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post