बिहार निवडणुकीसाठी शिवसेना- राष्ट्रवादी एकत्र लढणार...?वेब टीम : रत्नागिरी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी युती होण्याचे संकेत मिळत आहेत. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत सूचक विधान केले आहेत. 


शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात रविवारी चर्चा झाली. 


या भेटीत बिहार निवडणुकी विषयी चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.


यासंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 


मात्र, बिहारमध्ये एकत्र प्रचार करण्याची संधी मिळाली तर नक्कीच आनंद वाटेल. 


राज्यामध्ये एकत्र आहोत त्यामुळे बिहारसारख्या निवडणुकीत आम्ही एकत्र आलो तर चांगलेच होईल, असे सूचक विधान सुनील तटकरे यांनी दिले आहे.


यावेळी तटकरे यांनी आरेतील मेट्रोची कारशेड कांजूरला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचेही कौतुक केले. 


आरेसंदर्भातील मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे. यापूर्वीच्या सरकारकडून ‘रात्रीस खेळ चाले’ या पद्धतीने रात्रीच झाडे तोडली. 


परंतु, उद्धव ठाकरे यांनी पर्यावरणाचे संतुलन राखत राज्य सरकारची जागा विनामोबदला मेट्रोच्या कारशेडसाठी उपलब्ध करुन दिली आहे. 


पर्यावरण राखण्याची जबाबदारी येत असते त्यावेळी तोट्याचा विचार केला जाऊ नये. 


देवेंद्र फडणवीस हे केवळ विरोधाला विरोध म्हणून या निर्णयावर टीका करत असल्याचे सुनील तटकरे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post