वेब टीम : मुंबई बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी सर्व ३२ आरोपींना निर्दोष ठरवले. त्य...
वेब टीम : मुंबई
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सबळ पुरावे नसल्याचे नमूद करत विशेष सीबीआय न्यायालयाने बुधवारी सर्व ३२ आरोपींना निर्दोष ठरवले.
त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांचा समावेश आहे.
बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं.
त्यामुळे बाबरी नक्की कोणी पाडली?, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
आणि याच उत्तर शिवसेनेनं आजच्या सामानातून दिले आहे.
बाबरी कोणी पाडली याच उत्तर शिवसेनाप्रमुखांनी केव्हाच देऊन टाकले होते, असे उत्तर शिवसेनेनं दिल आहे.
‘अयोध्या रामाचीच’ असा सुप्रीम कोर्टाचा आदेश येऊनही आणि राममंदिराचे काम सुरू होऊनही बाबरी पाडल्याचा खटला मात्र सुरूच राहिला.
विशेष न्यायालयाच्या आदेशानंतर ही औपचारिकताही आता संपुष्टात आली आहे. सगळेच निर्दोष सुटले, कोणीच दोषी नाही, मग बाबरी पाडली कोणी?
असा प्रश्न आता विचारला जात आहे. त्याचे उत्तर शिवसेनाप्रमुखांनी केव्हाच देऊन ठेवले आहे.
बाबरी पडली म्हणूनच तर राममंदिराच्या भूमिपूजनाचा सुदिन आपण पाहू शकलो; अन्यथा हे भूमिपूजन शक्य झाले असते काय?
त्यामुळे उगाच जुनी थडगी उकरून माहोल खराब करण्यापेक्षा बाबरी प्रकरण फाइलबंद करण्याच्या न्यायालयाच्या निकालाचे सर्वांनीच स्वागत करायला हवे.
तेच देशहिताचे आहे! असा सल्ला शिवसेनेनं न्यायालयाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना दिला आहे.