राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत गुरुवारपासून 'ही' ठिकाणे होणार चालू...वेब टीम : मुंबई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत आहे. 


राज्यात मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्य सरकारने नवीन परिपत्रक जारी केले आहे. 


मुंबईत उद्यापासून मेट्रो रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. 


त्याशिवाय, राज्यात उद्यापासून ग्रंथालये सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली असून शाळा-कॉलेज मात्र ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.


राज्य सरकारने आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत धार्मिक स्थळं उघडण्याबाबत मात्र कुठलाही आदेश देण्यात आलेला नाही. 


‘अनलॉक-५’मध्ये सरकारने बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि मॉल यांना उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. 


त्यानंतर ग्रंथालयं सुरू करण्याची मागणी होत होती. 


त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार राज्यभरातील ग्रंथालयं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 


याशिवाय, कन्टेनमेंट झोनबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 


यामध्ये कन्टेनमेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू  ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post