एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत रावसाहेब दानवेंच मोठं वक्तव्य.... म्हणाले...वेब टीम : मुंबई

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 


मात्र, ‘एकनाथ खडसे हे भाजप सोडून कुठेही जाणार नाही.’ असे स्पष्ट मतच आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडले.


ते प्रवरानगर येथे बोलत होते.


लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे आज प्रकाशन झाले. 


या कार्यक्रमासाठी दानवे हे प्रवरानगर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना खडसेंबाबत आपली भूमिका मांडली . 


एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत.


त्यांच्यासोबत मी सतत बोलत असतो. मी त्यांच्या संपर्कात आहे. भाजप वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. 


आता पक्षामध्ये एखाद्याला संधी मिळत असते, एखाद्याला मिळत नाही. 


मात्र, खडसे यांना नक्की संधी मिळेल, त्यांना काही आम्ही वाळीत टाकले नाही. 


ते भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत, असे दानवे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post