आहे ते जंगल कापायचे आणि काही कोटी झाडे लावायच्या थापा मारायच्या हे मला जमत नाही; मुख्यमंत्र्यांचा टोलावेब टीम : मुंबई

मेट्रोच्या कार शेडसाठी आरेची जागा घेण्याचा निर्णय शासनाने रद्द केली असून आता कांजूर येथे ही कारशेड होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.


आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सुनील केदार यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. 


अधिकाऱ्यांनीही यासाठी मनापासून मदत केल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 


जंगल आहे ते कापायचे आणि काही कोटी झाडे लावायच्या थापा मारायच्या हे मला जमत नाही, असा टोलाही त्यांनी भाजपचे नांव न घेता लगावला.


अवकाळी पाऊस आणि निसर्ग वादळ यामुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे सांगत ठाकरे म्हणाले, "कोकणात निसर्ग चक्रीवादळ आले. 


पूर्व विदर्भात पूरस्थिती गंभीर होती. कोकणात बऱ्याबैकी मदत देऊन झाली आहे. पूरस्थितीचे सर्व पंचनामे झाले आहेत. 


सांगली कोल्हापूरप्रमाणे पूरस्थितीत नुकसान भरपाई देतो आहोत. आताही जिथे नुकसान होते आहे तिथे पंचनाम्यांचे आदेश दिले आहेत,'' 


''आम्ही साडे एकोणतीस लाख शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ जे विकेल ते पिकेल अशी आपण घोषणा केली होती. केले. 


पण हे चक्र सुरुच राहते. कांद्याच्या साठवणुकीसाठी आपण महाओनियन सुरु केले, कांद्याच्या साठवणुकीसाठी. तशीच शीतगृहे, गोदामे दिली जातील.  


केंद्राने कृषी कायदा केला. त्यातले शेतकऱ्यांच्या हिताचे काय आणि घातक काय याचा विचार केला. शेतकरी संघटनांशी चर्चा केली. 


आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे करु. सर्व संघटनांशी बोलतो आहोत. काही आक्षेप आहेत. 


हे सर्व समजून घेऊन त्याबाबत निर्णय घेणार,'' असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post